30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeमहाराष्ट्रतब्बल १६० किलो वजनाच्या महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

तब्बल १६० किलो वजनाच्या महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

दोघांचीही प्रकृती ठणठणीत

छत्रपती संभाजीनगर : शहरातील डॉक्टरांनी तब्बल १६० किलो वजनाच्या महिलेची गुंतागुंतीची प्रसूती यशस्वी करण्याची किमया केली आहे. तर, मराठवाड्यातील सर्वांत वजनदार महिलेची दुसरी प्रसूती समजली जात आहे. यापूर्वी शासकीय घाटीतील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात १६२ किलो वजनाच्या महिलेची प्रसूती करण्यात आली होती. त्यानंतर आता शहरातील एका खाजगी रुग्णालयात १६० किलो वजनाच्या महिलेची प्रसूती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून दोघींचीही प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

स्थूल महिलांची प्रसूती बहुतांशी वेळा अधिक गुंतागुंतीची असते, त्यामुळे यासाठी डॉक्टरांनी विशेष काळजी घ्यावी लागते. दरम्यान, शहरातील बाबा पेट्रोलपंप परिसरातील असलेल्या एका खाजगी रुग्णालयात तब्बल १६० किलो वजनाच्या महिलेची प्रसूती सुखरूप पार पडली. या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून दोघींचीही प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.

या तीस वर्षीय महिलेस लग्नानंतर आठ वर्षांनी गर्भधारणा झाली. अतिवजनामुळे सोनोग्राफीत गर्भातील बाळ व्यवस्थित दिसत नव्हते. शिवाय प्रसूतीदरम्यान गुंतागुंत झाल्यास ऐनवेळी इतरत्र हलविण्याची वेळ आली तर महिलेला उचलायचे कसे, ही चिंता डॉक्टरांना भेडसावत होती. या सगळ्या अडचणींवर मात करून शहरातील एका खाजगी रुग्णालयात डॉक्टरांनी सिझेरियन प्रसूती यशस्वी केली. डॉ. शुभांगी तांदळे पाळवदे, डॉ. खुशबू बागडी-कासट, भूलतज्ज्ञ डॉ. प्रियंका मित्तल- गयाळ, डॉ. दीपक गयाळ, डॉ, प्रशांत आसेगावकर, डॉ. पळणीटकर, डॉ. खटावकर आदींनी यासाठी प्रयत्न केले.

नियमितपणे आरोग्य तपासणी…
शहरातील एका शासकीय संस्थेमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेल्या ३० वर्षीय महिलेस लग्नानंतर आठ वर्षांनी गर्भधारणा झाली. मात्र, सोनोग्राफीमध्ये गर्भातील बाळ व्यवस्थित दिसत नसल्याने अन्य डॉक्टरांनी तिला गर्भपाताचा सल्ला दिला होता, त्यामुळे ही महिला अतिशय निराश झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR