24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeधाराशिववाखरवाडी येथील एका तरूणाचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू

वाखरवाडी येथील एका तरूणाचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील वाखरवाडी येथील एका ३५ वर्षीय तरूणाचा दुचाकी-ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाणे येथे ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात १३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील वाखरवाडी येथील सुशीलकुमार आण्णासाहेब शिंदे (वय ३५) व संदिप भिमराव शिंदे (वय ४५) हे दोघे ३ डिसेंबर रोजी दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी ढोकी येथे लातूर रस्त्यावर इंडीयन ऑईल पंपासमोर आली असता कुबोटा ट्रॅक्टरच्या किरण दत्तात्रय वाघमारे रा. बाभळगाव ता. कळंब या चालकाने धडक दिली. त्यांनी त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून सुशीलकुमार शिंदे यांचे दुचाकीला धडक दिली.

या अपघातात सुशीलकुमार शिंदे व संदीप शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले. उपचार दरम्यान सुशिलकुमार शिंदे हे मयत झाले. या प्रकरणी लालासाहेब गोविंद शिंदे यांनी दि. १३ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) सह १८४ मोवाका अन्वये ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR