मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानचा काही दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात लग्न सोहळा पार पडला यानंतर आता आमिर दुसरी पत्नी किरण रावबरोबर ट्रीपवर गेला आहे. त्याचे काही फोटो किरण रावने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्यांचा मुलगा आझाद खान देखील दिसत आहे.
किरणने निसर्गाच्या सानिध्यातील हे फोटो शेअर करत ‘रोड ट्रिपिंग विथ सुंदरी’असे कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये किरणने फिकट तपकिरी रंगाचा टर्टलनेक स्वेटर आणि कार्गो पँट परिधान केली आहे. आमिरने जॅकेट आणि जीन्स तर मुलगा आझादने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पँट घातली आहे, असे दिसत आहे. या ट्रीपसाठी तिघेही स्टायलिश लूकमध्ये दिसत आहेत.
अलीकडेच किरण राव पतीच्या पहिल्या पत्नीची मुलगी आयरा खान आणि जिम ट्रेनर नुपूर शिखरेच्या लग्नात सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, आमिर खान आणि किरण राव त्यांच्या १५ वर्षांच्या संसारानंतर २०२१ मध्ये वेगळे झाले. परंतु विभक्त झाल्यानंतरही ते एकत्र आनंदाने काम करताना दिसतात.
‘लापता लेडीज’ या चित्रपटाच्या किरण राव या दिग्दर्शिका आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे. हा चित्रपट ‘लापता लेडीज’ नावाच्या बिप्लब गोस्वामी यांच्या पुरस्कार विजेत्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट १ मार्च २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.