22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजनआमिर खान साकारणार किशोर कुमार यांची भूमिका?

आमिर खान साकारणार किशोर कुमार यांची भूमिका?

मुंबई : प्रतिनिधी
अभिनेता आमिर खान दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.अनुराग बसू आणि भूषण कुमार किशोर कुमार यांच्या आयुष्यावर एक बायोपिक बनवत आहेत.

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, आमिर खानला किशोर कुमार खूप आवडतात आणि त्यांच्या वरील प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी तो उत्सुक आहे. त्यातच दिग्दर्शक अनुराग बसूची एक हटके स्टाईल आहे जी त्याला खूप आवडते.

त्यामुळेच तो या प्रोजेक्टमध्ये उत्साहाने सहभागी झाला असल्याची चर्चा आहे.
मात्र आमिर या सिनेमात काम करणार की नाही हे अजून निश्चित झालेले नाही शिवाय या सिनेमाची कोणतीही अपडेट अजून समोर आली नाही. आमिर खान या वर्षाच्या अखेरीस किशोर कुमार यांच्या बायोपिकवर काम सुरू करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आमिर खानने नुकतेच त्याच्या ‘सीतारे जमीन पर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR