22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeराष्ट्रीयपंजाब पोटनिवडणुकीसाठी ‘आप’ ने सुरू केली तयारी

पंजाब पोटनिवडणुकीसाठी ‘आप’ ने सुरू केली तयारी

चंदिगड : लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील चार आमदार खासदार झाले आहेत. या चार जागांवर लवकरच पोटनिवडणूक होणार असून, सत्ताधारी पक्ष ‘आप’ने राज्यात पोटनिवडणुकीसाठी आपली तयारी सुरू केली असून, चार विधानसभा पोटनिवडणुकांसाठी आम आदमी पार्टीने (आप) प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. जालंधर पश्चिमची जागा जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाला इतर भागातही आपली मजबूत पकड निर्माण करायची आहे.

‘आप’ने जारी केलेल्या आदेशानुसार पंजाबमधील डेरा बाबा नानक, गिद्दरबाहा, चब्बेवाल आणि बरनाळामधून विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.

पक्षाने कुलदीप सिंग धालीवाल यांची प्रभारी म्हणून आणि अमंशेर सिंग शरी कलसी यांची डेरा बाबा नानकचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच गिद्दरबाहातून अमन अरोरा यांना प्रभारी आणि दविंदर सिंग लाडी यांना सहप्रभारी, चब्बेवालमधून हरजोत बैंस यांना प्रभारी आणि करमबीर सिंग घुमान यांना प्रभारी म्हणून घोषित करण्यात आले तर बरनाळामधून गुरमीत सिंग मीत हेयर यांना प्रभारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर चेतनसिंग जोरमाजरा यांना सहप्रभारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR