22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeराष्ट्रीयकेजरीवाल यांच्या अटकेविरोधात 'आप' आमदारांची घोषणाबाजी

केजरीवाल यांच्या अटकेविरोधात ‘आप’ आमदारांची घोषणाबाजी

नवी दिल्ली : दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाचा निषेध सुरूच आहे. आत ‘मैं भी केजरीवाल’ असे लिहिलेली टी-शर्ट घालून आपच्या आमदारांनी विधानसभेवर मोर्चा काढला. यावेळी मोदी सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज, आतिशी, आम आदमी पक्षाचे आमदार संजीव झा यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप आमदारांनी सभागृहातही जोरदार घोषणाबाजी केल्याने दिल्ली विधानसभेचे कामकाज १ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दिल्ली विधानसभेबाहेर झालेल्या निदर्शनादरम्यान, आप नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की येथे प्रत्येकजण मुख्यमंत्री केजरीवाल यांना समर्थन देण्यासाठी आले आहेत. दिल्लीतील लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला केंद्र सरकार काम करू देत नाही. केंद्र सरकार तपास यंत्रणेचा गैरवापर करत आहे आणि विरोधकावर दडपशाही लादली जात आहे, असे भारद्वाज म्हणाले.

भाजपने हुकूमशाहीच्या मर्यादा ओलांडल्या

आम आदमी पक्ष भाजपच्या हुकूमशाहीच्या विरोधात असल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात तपास यंत्रणेला पुढे करून आमच्या नेत्यांवर छापे टाकले जात असून खोट्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात येत आहे. आमचे चार मोठे नेते तुरुंगात आहेत. भाजपच्या लोकांनी हुकूमशाहीच्या सर्व मयार्दा ओलांडल्या आहेत. ते आम आदमी पक्षावर दबाव आणत आहेत. ते आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ही लढाई आम्ही लढत राहू. असेही भारद्वाज म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR