29.2 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeराष्ट्रीयअबब...तब्बल १४ कोटींच्या रेल्वेच्या बेडशीट चोरीला!

अबब…तब्बल १४ कोटींच्या रेल्वेच्या बेडशीट चोरीला!

बेडशीट चोरल्यास कारवाई करणार भारतीय रेल्वेची माहिती

नवी दिल्ली : प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे विशेष काळजी घेत आहे. एसीने प्रवास करणा-या प्रवाशांना रेल्वेकडून टॉवेल आणि बेडशीट दिले जातात. मात्र, हे बेडशीट टोरल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे विशेष काळजी घेत आहे. एसीने प्रवास करणा-या प्रवाशांना रेल्वेकडून टॉवेल आणि बेडशीट दिले जातात. प्रवासी या वस्तू वापरु शकतात. मात्र, काही लोक प्रवास संपल्यानंतर ते घरी घेऊन जातात. ट्रेनमध्ये मिळणारे बेडशीट आणि टॉवेल तुम्ही घरी घेऊन जाणे योग्य नाही. कारण ते तुम्हाला महागात पडू शकते. आतापर्यंत रेल्वेचे १४ कोटी रुपयांचे टॉवेल आणि बेडशीट चोरीला गेले आहेत. तुम्ही जर रेल्वेतून बेडशीट आणि टॉवेल चौरला तर तुम्हाला दंड किंवा तुरुंगापर्यंतची शिक्षाही होऊ शकते. दरम्यान, तुमचा प्रवास संपल्यानंतर ट्रेनमध्ये वापरलेले बेडशीट आणि टॉवेल तुम्ही सोबत नेणे अपेक्षीत नाही. तुमचा प्रवास संपल्यानंतर ते तिथेच ठेवणे गरजेचे आहे. कारण जर तुमच्याजवळ ट्रेनच्या बाहेर पडल्यानंतर बेडरोलचे साहित्य आढळले तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया की जर कोणाला बेडरोलचे साहित्य आढळून आले किंवा कोणी चादर किंवा टॉवेल चोरला तर त्याच्यावर काय कारवाई केली जाते?

एक हजार रुपयांचा दंड, तुरुंगवासाची शिक्षा होणार
प्रवासाच्या वेळी दिलेला टॉवेल आणि बेडशीट अनेकजण घरी घेऊन जातात असे करताना कोणी पकडले तर त्या प्रवाशाविरुद्ध कारवाई होऊ शकते. वास्तविक ही रेल्वेची मालमत्ता मानली जाते आणि रेल्वे मालमत्ता कायदा १९६६ अंतर्गत ट्रेनमधून माल चोरीच्या विरोधात कारवाई करण्याची तरतूद आहे. अशा प्रकरणात या गुन्ह्यासाठी एक वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि एक हजार रुपये दंडही होऊ शकतो. तुरुंगवासाची शिक्षा ५ वर्षांपर्यंत वाढू शकते.

रेल्वेने दिला होता बेडरोलचा सल्ला
जेव्हा तुम्ही एसी कोचमधून प्रवास करत असता तेव्हा रेल्वेच्या बेडरोलमध्ये दोन चादरी, एक ब्लँकेट, एक उशी, एक उशाचे कव्हर आणि एक टॉवेल समाविष्ट असतो. मात्र, आता रेल्वेकडून टॉवेल क्वचितच पुरवले जातात. तर, एसी क्लासमध्ये प्रवास करणा-यांनाच बेडरोल दिला जातो. मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०१७-१८ मध्ये १.९५ लाख टॉवेल, ८१,७७६ बेडशीट, ५,०३८ पिलो कव्हर आणि ७,०४३ ब्लँकेट चोरीला गेले. तसेच दरवर्षी मोठ्या प्रमाणात बेडरोलच्या वस्तूंची चोरी होते. या वस्तूची किंमत सुमारे १४ कोटी रुपये असल्याचे समजते. अशा परिस्थितीत, लोकांची चोरी होऊ नये म्हणून रेल्वेने प्रवास संपण्यापूर्वी अर्धा तास आधी बेडरोलच्या वस्तू जमा करण्याचा सल्ला दिला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR