नागपूर : तांदळाच्या अवैध साठ्याच्या प्रश्नावर पणन मंत्री अब्दुल सत्तार उत्तर देत असताना विरोधकांकडून वारंवार हस्तक्षेप करण्यात येत होता. त्यामुळे वैतागलेल्या सत्तार यांनी विरोधकांपुढे हात जोडत विधानसभा अध्यक्षांकडे संरक्षणाची मागणी केली.
यावेळी सुनील केदार आणि सत्तार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. केदार हे मला वारंवार डिस्टर्ब करतात, अशी तक्रारच सत्तार यांनी केली. नार्वेकर यांच्या हस्तक्षेपानंतर सत्तार यांनी उत्तर दिले.
काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी तांदळाच्या बेकायदा साठ्याबाबतचा मुद्दा उपस्थित करत संबंधित पुरवठादाराचा परवाना रद्द करणार का, असा सवाल केला. गृह आणि पुरवठा विभागाच्या कारवाईत तांदळाचा साठा सापडला आहे. पुरवठादार साठा करू शकतो का, त्याच्यावर काय कारवाई केली आणि त्याचे लायसेन्स आपण रद्द करणार का, असा सवाल कांबळे यांनी केला.