31.7 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपकडून ईडीचा गैरवापर; शरद पवारांकडून चिंता व्यक्त

भाजपकडून ईडीचा गैरवापर; शरद पवारांकडून चिंता व्यक्त

पुणे: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या अडचणी वाढवण्यासाठी त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता स्वत: शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. त्यासोबत २०१९ ते २०२४ पर्यंत ईडीने केलेल्या कारवाईचा आकडा वाचून दाखवत भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. भाजपा ईडीचा विरोधीपक्ष संपवण्यासाठी वापर करत आहे, असाही आरोप शरद पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत, ईडीने केलेल्या कारवाईचा दाखला वाचून दाखवला, सोबत रोहित पवार यांना अटकेची कारवाई होण्याच्या शक्यतेबाबत पवार यांनी चिंता व्यक्त केली.

ईडीचा वापर हा निवडणुकांना समोर जाणा-या लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा केला जात आहे. ईडी, सीबीआय, आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर हा सर्रास विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला गेला आहे. रोहित पवारांच्या बाबतीत देखील त्यांच्या कारखान्याच्या जप्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आलीय. अवसायानात निघालेले निम्म्याहून अधिक कारखाने पंचवीस कोटीहून कमी रकमेला विकले गेले. रोहित पवारांच्या कंपनीने कारखाना पन्नास कोटींना विकला गेला असे पवार म्हणाले.

ईडीच्या पाच हजार केसेसपैकी फक्त पंचवीस केसेसचा निकाल लागलाय. त्यातील किती प्रकरणात लोक दोषी आढळलेत याचे प्रमाण शुन्य टक्क्यांहून कमी आहे. २००४ ते २०१४ या काँग्रेसच्या सत्तेच्या कालावधीत ईडीने २६ कारवाया केल्या. त्यातील ४ नेते काँँग्रेसचे होते तर तीन नेते भाजपचे होते. याचा अर्थ कॉंग्रेसच्या सत्ताकाळात ईडीचा गैरवापर होत नव्हता. त्यामुळे आताचे भाजपाचे सत्ताधारी लोक हे ईडीचा उपयोग दहशत निर्माण करण्यासाठी करत आहेत, असा आरोप पवारांनी केला.

रोहित पवार यांच्यावरील ईडी कारवाईबाबत रोहित पवार यांना अटक होण्याची शक्यता आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, याबाबत भरवसा नाही. कारण, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना देखील अटक करण्यात आली होती, असं म्हणत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

ईडी म्हणजे भाजपाचा सहकारी पक्ष
आम्ही सगळी माहिती मिळवली त्यावेळी समोर आलं की ईडीने २००५ ते २०२३ या सतरा वर्षांच्या काळात दोन सरकारे होती. एक आमचे सरकार म्हणजे यूपीए सरकार होते आणि आत्ताचे सरकार आहे. ५९०६ केसेस नोंदवल्या गेल्या. यापैकी चौकशी करुन निर्णय लागला त्या फक्त २५ केसेस आहेत. असाही आरोप शरद पवार यांनी केला. त्याचप्रमाणे ईडी ही संस्था भाजपाचा सहकारी पक्ष असल्यासारखी वागते आहे. ईडीचे अधिकारी त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडतात की भाजपाच्या कार्यालयातून हेच कळत नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR