21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात मामीकडून भाचीवर अत्याचार

पुण्यात मामीकडून भाचीवर अत्याचार

पुणे : पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मामीनेच आपल्या भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून मामीला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे शहर हादरले आहे. या प्रकारावर संताप देखील व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल २ वर्षांनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२१ मध्ये भाची आपल्या मामाकडे राहण्यासाठी आली होती. त्यावेळी मामा कामासाठी बाहेर गेल्यावर मामी ९ वर्षांच्या चिमुकलीला विवस्त्र करायची आणि मारहाण करत असे. त्याचबरोबर तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील करत असे.

कोरोनाच्या काळात चिमुकलीच्या आईने तिला आपल्या भावाच्या घरी पाठवले होते. फिर्यादी महिलेचा भाऊ हवाई दलात नोकरी करतो. तो आपल्या कुटुंबासह हवाई दल वसाहतीत राहतो. कोरोना काळानंतर मुलगी पुन्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, मामी या ९ वर्षांच्या चिमुकलीला सतत मारहाण करत होती. तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढायची तसेच जीवे मारण्याची धमकीही देत होती. पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR