22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रसत्ता येते नि जाते, कुणाला सोडणार नाही

सत्ता येते नि जाते, कुणाला सोडणार नाही

राजापूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौ-याचा आज शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधा-यांसह अधिका-यांवरही जोरदार हल्ला चढवला आहे. राजन साळवींच्या विरोधात कोणी तक्रार केली? काय मिळाले तुम्हाला? सत्ता येते आणि जाते. अधिका-यांना सांगून ठेवतो, वेळ बदलते. कोणाला सोडणार नाही, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच राजन साळवींच्या विरोधात जो उमेदवार आहे, तो जे पैसे वाटतोय त्याची चौकशी करा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे आज राजापुरात आहे. राजपूरमध्ये एका सभेत बोलताना त्यांनी हा इशारा दिला. आज मुद्दाम राजापूरात आलोय. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. बाजूलाचा पवित्र दर्गा आहे. जो कोणी देशाला आपले मानतो, देशासाठी मरायला तयार आहे. लढायला तयार आहे हे आमचे हिंदुत्व आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी एसीबीने साळवी यांच्या घरातील संपत्तीची किंमत केलेली यादी वाचून दाखवली. या यादीवर सावंत नावाच्या व्यक्तीची सही आहे. राजन साळवींना धन्यवाद द्यायला आलो आहे. सुशांत चव्हाण तुम्ही महाराजांच्या मूर्तीची किंमत केली आहे. किती तर पाच हजार रुपये. बाळासाहेबांचा फोटो आणि खुर्ची याची किंमत दहा हजार रुपये. माझ्या वडिलांची किंमत मिंध्याना कळली पण तुम्हाला नाही कळली. सर्वांचे दिवस फिरतात हे लक्षात ठेवा आता त्यांचे दिवस आहेत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

तुमच्या सात पिढ्या आल्या तरी त्याची किंमत करता येणार नाही. तुमच्या आई वडिलांची किंमत केली तर तुमची किंमत किती? मिंध्याना त्यांच्या वडिलांची किंमत कळाली नाही म्हणून माझा बाप चोरताहेत, असा हल्लाच उद्धव ठाकरे यांनी चढवला.

सपत्नीक दर्शन
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी धूत पापेश्वर मंदिरात सपत्नीक दर्शन घेतले. पुन्हा ठाकरे राज येऊ दे, असे साकडे यावेळी पापेश्वर देवाला घालण्यात आले. पुन्हा शिवसेना ऊबाठाची सत्ता येऊ देत, असे गा-हाणेही घालण्यात आले. मंदिराच्या परिसरात नव निर्माण सुरू आहे. त्या कामाची उद्धव ठाकरे पाहणी करणार आहे. आमदार राजन साळवी यांच्या फंडातून मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR