22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रतासगावजवळ अपघात, ६ ठार

तासगावजवळ अपघात, ६ ठार

सांगली : प्रतिनिधी
सांगलीच्या तासगाव-मणेराजुरी मार्गावर मंगळवारी मध्यरात्री आल्टो कार तासारी कॅनॉलमध्ये कोसळून झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एकजण जखमी झाला. चिंचणी तासगाव-मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला.

कॅनॉलमध्ये पाणी नसल्याने वेगात असलेली ऑल्टो कार कॅनॉलमध्ये आदळली. या जबर धक्क्याने कारमधील ६ जण जागीच गतप्राण झाले तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. हे कुटुंब तासगावमधील होते. अपघातावेळी ऑल्टो कारमध्ये एकूण ७ जण होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय तासगाववरून वाढदिवसासाठी कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला.

चालकाला डुलकी लागल्याने कार थेट कॅनॉलमध्ये कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये तीन लहान बालकांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच गावक-यासह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR