27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर अपघात; तीन ठार

समृद्धी महामार्गावर अपघात; तीन ठार

बुलडाणा : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर भरधाव कार ट्रकवर आदळल्याने एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी मलकापूर पांग्राजवळ घडली. राजेश दाभाडे (वय ४२), शुभांगी दाभाडे (वय ३२) आणि रियांश राजेश दाभाडे (वय ४) अशी मृतकांची नावे आहेत.

पुणे येथील राजेश दाभाडे यांचे कुटुंब कार (क्रमांक एएमच १७ एजे ९१७३)ने अमरावतीकडे येत होते. दरम्यान, समृद्धी महामार्गावर चॅनेल क्रमांक ३३४. ६०० नागपूर कॉरिडोरवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रक (क्रमांक एमएच २१ बीएच ५९७६)वर आदळली. ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये शुभांगी दाभाडे व राजेश दाभाडे हे जागीच ठार झाले. तसेच रियांश राजेश दाभाडे या चिमुकल्याला सिंदखेड राजा येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

कारमधील समीक्षा राजेश दाभाडे व कारचालक आश्विन धनवरकर हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णवाहिकेमध्ये औषधोपचार देण्यात आले आहेत. ट्रकचालक खाजा शेख (रा. जालना) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. जखमींना सिंदखेड राजा व दुसरबीड येथील १०८ रुग्णवाहिकेमधून उपचार करून सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात हलवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR