27 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeनांदेडदुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

मुखेड : प्रतिनिधी
मुखेड येथून स्कूटी वाहनावर गडग्याकडे जात असताना मुखेड तालुक्यातील खरब खंडगाव येथील पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेले श्री सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूस नॅशनल हायवे २२५ वर शहरातील सिद्धार्थ दत्तात्रेय जाधव वय ५० वर्ष यांच्या स्कुटी मोटारसायकल अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. ९ जून रोजी दुपारी घडली.

मुखेड शहरातील गायत्री गल्लीतील रहिवाशी सिद्धार्थ जाधव हे कुकुट पालनासाठी खाद्य आणण्यासाठी गडगा येथे आपल्या स्कुटी क्रमांक एम. एच. २६ बी. वाय ८५७९ या दुचाकीने जात असताना खरब खंडगाव येथील पेट्रोल पंपाच्या जवळील सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने? त्यांच्या छातीस जबर मार लागला असल्याची माहिती प्रथमदर्शनीय नागरिकांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR