24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयअनिल अंबानींना ‘अच्छे दिन’

अनिल अंबानींना ‘अच्छे दिन’

रिलायन्स इन्फ्राने चुकवले कर्ज 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील सर्वांत श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा प्रगतीचा आलेख नेहमी चढताच राहिला आहे. परंतु त्यांचे बंधू अनिल अंबानी यांच्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या. आता दीर्घ कालावधीनंतर अनिल अंबानी यांच्यासाठी चांगली बातमी आली आहे. अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आपले कर्ज चुकवले आहे. दुसरीकडे पुन्हा एकदा रिलायन्स पॉवरच्या शेअरने आपली पॉवर दाखवली आहे. या शेअरला बाजारात अपर सर्किट लागले आहे.

रिलायन्स इन्फ्राकडून बुधवारी सांगण्यात आले की, कंपनीच्या स्टँडअलोन  कर्जामध्ये ८०६ टक्क्यांची लक्षणीय घट झाली आहे. ही रक्कम ३,८३१ कोटी रुपयांवरून ४७५ कोटी रुपयांवर आली आहे. त्यामुळे कंपनीचे समभाग सात टक्क्यांहून अधिक वाढले. बीएसईवर ट्रेडिंग दरम्यान रिलायन्स इन्फ्राचे शेअर २५४.४० वर गेले होते. या शेअरमध्ये बुधवारी तब्बल दहा टक्के वाढ झाली आहे.

एलआयसीसोबत केली सेटलमेंट
रिलायन्स इन्फ्राने जाहीर केले की, कंपनीने इन्व्हेंट असेट सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडकडून कर्ज घेतले होते. कंपनीने काही चार्ज केलेल्या सिक्युरिटीजचे नूतनीकरण केले आहे. तसेच कंपनीने एलआयसी, एडलवाइस एसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, आयसीआयसीआय बँक, युनियन बँक आणि इतर अनेक बँका आणि अग्रगण्य वित्तीय संस्थांची थकबाकी पूर्ण भरली आहे. कंपनीने एलआयसीची थकबाकी ६०० कोटी रुपये भरली आहे. कंपनीने एनसीडीच्या संदर्भात एडलवाईसला २३५ कोटी रुपये पूर्ण दिले आहेत.

रिलायन्स पॉवरला अपर सर्किट
अनिल अंबानी यांची दुसरी कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्सने बुधवारी अपर सर्किटला स्पर्श केला. बीएसईमध्ये हा शेअर ३१.३२ रुपयांवर पोहोचला. कंपनीने सांगितले की, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या ई-रिव्हर्स लिलावाद्वारे ५०० मेगावॅट बॅटरी स्टोरेजचा करार कंपनीला मिळाल्याची बातमी आली. त्यामुळे रिलायन्स पॉवरच्या शेअरने चांगली कामगिरी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR