32.5 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeधाराशिवमला बोलत का नाही म्हणून महिलेवर अ‍ॅसीड हल्ला

मला बोलत का नाही म्हणून महिलेवर अ‍ॅसीड हल्ला

धाराशिव : प्रतिनिधी
माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु मला बोलत का नाही, असे म्हणत एकाने महिलेला मारहाण करून तीचे डोके फोडले. तीच्या हातावर अ‍ॅसीड फेकून गंभीर जखमी केले. ही घटना तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाणे येथे आरोपी मनोज मल्लीनाथ घोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील आरोपी मनोज मल्लीनाथ घोडके याने दि.१६ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घोडके वस्ती अणदुर येथे रेवती तुळशीदास घोडके यांच्या घरात घुसून लोखंडी पाईपने मारहाण केली. तु मला का बोलत नाही, तुझ्यावर माझे प्रेम आह,े असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाइपने डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच अ‍ॅसिड सारखा पदार्थ फिर्यादी महिलेच्या हातावर टाकून गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रेवती घोडके यांनी दि.१६ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पोलीस ठाणे येथे कलम ३२६ (अ), ३२४, ३२३, ४५२, ५०४, ५०६ भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR