32.9 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeमनोरंजनअभिनेता सैफ अली खान रुग्णालयात

अभिनेता सैफ अली खान रुग्णालयात

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या बाबतीत एक मोठी माहिती समोर आली आहे. सैफ अली खानवर कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली आहे. सैफला रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत होते.

सैफने स्वत: त्याच्या तब्येतीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झाली असून आता तो पूर्वीपेक्षा बरा आहे. सैफ अली खानची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नव्हती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्रास असहनीय झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सैफ अली खानच्या खांद्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली होती. तब्येतीचे अपडेट शेअर करताना सैफ म्हणाला, ही दुखापत आणि शस्त्रक्रिया हे आपण करत असलेल्या कामाचा परिणाम आहेत. डॉक्टरांचे सहकार्य आणि चाहत्यांच्या काळजीबद्दल मी सर्व हितचिंतकांचे आभार मानतो.

मीडिया रिपोर्टस्नुसार, विशाल भारद्वाज दिग्दर्शित रंगून चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याला ही दुखापत झाली होती. बराच काळ गेल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच चाहत्यांसाठी दोन मोठे सरप्राईज घेऊन येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR