22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयअभिनेत्री जयाप्रदा फरार घोषित

अभिनेत्री जयाप्रदा फरार घोषित

हैदराबाद : समाजवादी पक्षाच्या माजी खासदार, अभिनेत्री जयाप्रदा यांना फरार घोषित करण्यात आले. उत्तर प्रदेश पोलीस मुंबईपासून हैदराबादपर्यंत त्यांचा शोध घेत आहेत. निवडणूक आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणात त्यांच्या विरोधात खटला सुरू आहे.

जयाप्रदा नाहटा यांनी २०१९ मध्ये रामपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी त्याच्यावर स्वार आणि केमरी पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

या प्रकरणांची सुनावणी विशेष दंडाधिकारी न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणी होत असलेल्या सुनावणीच्या तारखांना जयाप्रदा सातत्याने गैरहजर राहिल्या आहेत. याच मुद्द्यावरून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR