26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदे-पवार भेटीवेळी अदानींचे सहकारी दालनात!

मुख्यमंत्री शिंदे-पवार भेटीवेळी अदानींचे सहकारी दालनात!

धारावी पुनर्विकास प्रकल्पावर चर्चा झाल्याचे संकेत?

मुंबई : विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि गाठीभेटींची राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा होत आहे. त्यातच, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे यांची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंनी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली, तर शरद पवार यांनी ८ दिवसांत दोनवेळा मुख्यमंत्र्­यांनी भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एकीकडे मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. मात्र, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे, आजच्या भेटीत या प्रकल्पावर चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

शरद पवार यांनी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदेंची भेट घेऊन राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली होती. मागील भेटीत मराठा-ओबीसी आरक्षण हा विषय होता, तसेच दुधाचा प्रश्न विरोधी पक्षातील नेत्यांच्या साखर कारखान्याला कर्ज न देणे हाही विषय बैठकीत चर्चेला होता. आता, महाविकास आघाडीत धारावी प्रकल्पावरुनच मत भिन्नता असल्याचं समोर आलं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे धारावी प्रकल्पाला विरोध करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे यांच्यासोबत धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत बैठक केल्याची माहिती माध्यमांत आली.

विशेष म्हणजे आज मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे यांच्यासमोर या प्रकल्पाबाबत प्रेझेंटेशन झालं असल्याची बाब सुत्रांनी दिली. त्यामुळे या विषयावरून महाविकास आघाडीत मत भिन्नता तर नाही ना अशी चर्चा समोर आली आहे. याबाबत शरद पवार म्हणाले, ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांसोबतची माझी बैठक संपली, त्यानंतर मी वर्षा निवासस्थानाबाहेर निघत असताना अदानींशी संबंधित काही व्यक्ती येथे होते. त्यामुळे, मुख्यमंत्र्­यांची शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR