23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeउद्योगयूपीआय आणि ई-कॉमर्समध्येही अदानींचा प्रवेश?

यूपीआय आणि ई-कॉमर्समध्येही अदानींचा प्रवेश?

गुगल पे आणि पेटीएमला देणार टक्कर अदानी क्रेडिट कार्डसाठीत बँकांशी चर्चा सुरू

नवी दिल्ली : गौतम अदानी समूह ई-कॉमर्स आणि फायनान्स क्षेत्रात व्यवसाय वाढवण्याची योजना आखत आहे. हा समूह केवळ युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या लायसन्ससाठी नाही तर, को-ब्रँडेड अदानी क्रेडिट कार्डसाठी बँकांशी चर्चादेखील करत आहे. मात्र, अदानी समूहाने या वृत्तावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अदानी समूहाच्या या नव्या निर्णयामुळे गुगल आणि पेटीएमसारख्या स्पर्धकांच्या अडचणी वाढू शकतात.

फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, अदानी समूह ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सद्वारे ऑनलाइन शॉपिंग ऑफर करण्यासाठी बोलणी करत आहे. ओएनडीसी हे सरकार समर्थित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी विक्रेते आणि खरेदीदार म्हणजेच ग्राहक दोघेही एकमेकांना थेट भेटतात. या प्लॅटफॉर्मवरून खरेदी करण्यासाठी पेमेंट अ‍ॅप असणे आवश्यक आहे. अदानी समूहाच्या नव्या प्रयत्नांना अंतिम स्वरूप मिळाल्यास अदानी वन या ग्राहक अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना ही सेवा उपलब्ध होणार आहे. हे अ‍ॅप २०२२ च्या अखेरीस लॉन्च करण्यात आले होते. फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगसारख्या ट्रॅव्हल सर्व्हिसेस या अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. रिपोर्टनुसार, समूहाचे ई-कॉमर्स आणि पेमेंट प्लॅटफॉर्म सर्वात आधी त्यांच्या विद्यमान ग्राहकांना टार्गेट करणार आहेत.

कोण आहेत स्पर्धक?
या क्षेत्रात अदानी समूहाचे अनेक स्पर्धक असतील. उदाहरणार्थ, गुगल, फोनपे आधीच यूपीआय-आधारित पेमेंट अ‍ॅप्स चालवत आहेत, तर पेटीएम आणि टाटासारख्या देशांतर्गत कंपन्या ओएनडीसीच्या माध्यमातून किराणा आणि फॅशन शॉपिंगची ऑफर देत आहेत.

अदानी देशातील तीन समूहापैकी एक
हा देश टाटा, अंबानी आणि अदानी हे तीनच समूह चालवतात. अदानी तीन गटांपैकी एक आहे, ज्यांच्याकडे कन्झ्युमर प्रोडक्टचा व्यवसाय नाही. अशा त-हेने या नव्या उपक्रमामुळे अदानी समूहासाठी नवी दारे खुली होणार आहेत अशी प्रतिक्रिया बंगळुरू स्थित टेक एक्सपर्ट जयंत कोल्ला यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR