18.3 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeराष्ट्रीययूपीएससीत आदित्य श्रीवास्तव देशात पहिला

यूपीएससीत आदित्य श्रीवास्तव देशात पहिला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
यूपीएससीचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव देशात रँक एक आला आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांचाही यादीत समावेश आहे. पहिल्या १०० जणांच्या यादीत अनिकेत हिरडे याचे नाव असून त्याची रँक ८१ वी आहे. यासोबतच बीडच्या अभिजित पाखरे यानेही ७२० वी रँकिंग मिळवित मोठे यश मिळविले आहे.

यूपीएससीची अधिकृत वेबसाईट यूपीएससी डॉट जीओव्ही डॉट इनवर उमेदवारांना आपला निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील प्रियांका सुरेश मोहिते हिचा रँक ५९५ आला आहे तर अर्चित डोंगरे याचा रँक १५३ आहे. २०२३ मध्ये यूपीएससीच्या ११४३ पदांसाठी जाहिरात निघाली होती. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ९ एप्रिल २०२४ रोजी मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांनतर आज निकाल जाहीर करण्यात आला.

उमेदवारांचे मार्क निकालाच्या घोषणेनंतर १५ दिवसांनी जाहीर करण्यात येतील. मुख्य परीक्षेत २८४६ उमेदवार उत्तीर्ण झाले होते. यातील जवळपास ७० उमेदवार हे महाराष्ट्रातील होते. यूपीएससीच्या परीक्षमध्ये १८० आयएएस, २०० आयपीएस आणि ३७ आयएफएस पदांसाठी भरती निघाली होती. यूपीएससीसाठी लाखो विद्यार्थी अर्ज करत असतात. परीक्षा कठीण असल्याने अनेक जण प्रिलिम परीक्षेमध्येच बाहेर पडतात.

महाराष्ट्रातील विद्यार्थी
अनिकेत हिरडे : ८१वे रँक
पाटील विनय सुनील : १२२ वे रँक
आशिष पाटील (कोल्हापूर) १४७ रँकिंग
अर्चित डोंगरे : १५३ वे रँक
फरहान जमादार (कोल्हापूर) १९१ रँकिंग
निरंजन जाधव (बारामती) : २८७ वे रँक
वृषाली कांबळे (कोल्हापूर), ३१० वी रँकिंग
प्रियांका सुरेश मोहिते : ५९५ वे रँक
अभिजीत पाखरे (बीड) : ७२० वा रँक

१०१६ उमेदवार उत्तीर्ण
यूपीएससी परीक्षेत १०१६ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ३४७ उमेदवार खुल्या प्रवर्गाचे, ११६ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे, ३०३ उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, १६५ उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर ८६ उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण खुला प्रवर्ग : ३४५, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग : २८, ओबीसी : ५२, अनुसूचित जाती : ५ तर अनुसूचित जमाती : ४ असे होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR