पूर्णा : शहरातील अभिनव विद्या विहार प्रशाला शाळेच्या १९९६ बॅच १०वीचे विद्यार्थी शिक्षकासह २८ वर्षाच्या नंतर स्नेह संमेलनाच्या निमिताने दि.११ फेब्रुवारी रोजी आले एकत्र आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन अभिनव विद्या विहार शाळेत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उंडेगावकर तर प्रमुख उपस्थितामध्ये हिराजी भोसले, तांबे पाईकराव, सरा यमगर, शिंदे, माने, गायकवाड आदि उपस्थित होते.
पहिल्या प्रथम दिप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जे विद्यार्थी शिक्षक मृत्यु पावले त्यांना श्रद्धाजली अर्पण करून राष्ट्रगीत घेतले. त्यानंतर शिक्षक, सेवकांचा सन्मानचिन्ह, गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सर्वांना सुरूची भोजनाचा आस्वाद घेतला. सुत्रसंचलन रेखा जोंधळे, मिना भालेराव, प्रास्ताविक डॉ. सचिन भायेकर यांनी केले. यशस्वीतेसाठी आनंद अजमेरा, सुरेश लोखंडे, अमोल सोनटक्के, सचिन जैस्वाल आदिंनी प्रयत्न केले.