22.9 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeमनोरंजनआदित्यचा 'मुंज्या'नंतर 'ककुडा'

आदित्यचा ‘मुंज्या’नंतर ‘ककुडा’

मुंबई : मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा नुकताच रिलीज झालेला ‘मुंज्या’ सिनेमा सुपरहिट झाला. हॉरर कॉमेडी असलेल्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता आदित्यचा आगामी ‘ककुडा’ हा हॉरर कॉमेडी सिनेमा रिलीज होत आहे. यामध्ये रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलेम यांची मुख्य भूमिका आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी आताच सुपरहिट आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

‘ककुडा’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. एक गाव ज्याला दोन दरवाजे असतात. छोटा दरवाजा ककुडा या भूतासाठी असतो जो दर मंगळवारी संध्याकाळी ७.१५ वाजता ककुडासाठी खुला ठेवावा लागलो. जर कोणी असे केले नाही तर १३ व्या दिवशी त्याचा मृत्यू होतो. सिनेमात साकीब सलेम आणि सोनाक्षी सिन्हा हे कपल आहे. तर रितेश देशमुखला भूताला पळवून लावण्यासाठी गावात बोलवले जाते. स्त्री, मुंज्या प्रमाणेच हाही सिनेमा तुफान कॉमेडी आणि हॉरर असणार आहे.

१२ जुलै रोजी ‘ककुडा’ झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. सिनेमातील डायलॉग्स ऐकून जोरजोरात हसू फुटेल. सिनेमाची गोष्ट ककुडाच्या शापावर आधारित आहे ज्याची गावात दहशत असते. रितेश, सोनाली आणि साकीब या तिकडीची धमाल सिनेमात पाहायला मिळणार आहे. तसेच ‘पंचायत’ सीरिजमधला जावई अभिनेता आसिफ खानही या सिनेमात आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेंड झहीर इकबालसोबत तिने रजिस्टर मॅरेज केले. लग्नानंतर रिलीज होणारा तिचा हा पहिलाच सिनेमा आहे. सोनाक्षी सिन्हा सध्या नव-यासोबत हनिमून एन्जॉय करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR