22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीयकाँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कर्तव्यदश रेल्वेची विनेशला कारणे दाखवा नोटीस

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कर्तव्यदश रेल्वेची विनेशला कारणे दाखवा नोटीस

नवी दिल्ली : भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. नुकतेच गेल्या आठवड्यात तिचे पदक थोडक्यात हुकले होते. त्यानंतर तिने कुस्तीतून निवृत्तीही घेतली. आता दोनदिवसांपूर्वीच तिने राजकारणाच्या आखाड्यात प्रवेश केला आहे. तिने कुस्तीपटू बजरंग पुनियासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर लगेचच तिला हिमाचल प्रदेशातून काँग्रेसने आगामी विधानसभेसाठी उमेदवारीही दिली.

अशातच आता असे समोर आले आहे की रेल्वेकडून विनेशला कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत उत्तर रेल्वेच्या अधिका-यांकडून पुष्टी करण्यात आली आहे. विनेश रेल्वेमध्ये नोकरीला होती. उत्तर रेल्वेच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार ४ सप्टेंबर २०२४ रोजी तिला ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासूनच विनेश काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. तिने राहुल गांधी यांची भेटही घेतली होती.

अधिका-याने पुढे सांगितले की ती सरकारी कर्मचारी असल्याने ती राजकीय पक्षात सामील होणे हा सेवा नियमांचे उल्लंघन आहे, त्यामुळे तिला तिची भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आले आहे. तथापि काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी शुक्रवारी आरोप केला की विनेशने रेल्वेचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र रेल्वेचे सीपीआरओ हिमांशू उपाध्याय यांनी हा आरोप फेटाळला आहे. उपाध्याय यांनी सांगितले की तिने राजीनामा देण्यापूर्वीच तिला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ३१ उमेदवारांची यादी जाहीर शुक्रवारी जाहीर केली. यामध्ये विनेश फोगाटला काँग्रेसने जुलाना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या या मतदारसंघात जननायक जनता पार्टीचे अमरजीत धांडा हे आमदार आहेत. विनेश पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत सहभागी झाला होता. या स्पर्धेत ती ५० किलो वजनी गटात सामील झाली होती. तिने तिच्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तीन सामने जिंकत अंतिम फेरीतही स्थान मिळवले होते.

परंतु, अंतिम सामन्याच्या दिवशी तिचे वजन साधारण १०० ग्रॅम अधिक भरले. त्यामुळे तिला अंतिम सामन्यापूर्वी ऑलिम्पिक समितीकडून अपात्र ठरवण्यात आले होते. त्यावर तिने क्रीडा लवादाकडे दादही मागितली. मात्र तिची याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे तिची पदक मिळवण्याची संधीही हुकली. या प्रकरणादरम्यान तिने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR