27.4 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रशरद पवारांनंतर ठाकरे गटाचा पहिला उमेदवार जाहीर

शरद पवारांनंतर ठाकरे गटाचा पहिला उमेदवार जाहीर

राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन पाटील तर हडपसरमध्ये ठाकरे गटाकडून बाबर यांचे नाव घोषित

पुणे : महाविकास आघाडीत शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जागावाटप होण्यापूर्वीच काही जागांवर उमेदवार घोषित केले जात आहेत. त्यामध्ये, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज आणखी एक उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तत्पूर्वी, आमदार रोहित पवार व समरजीत घाटगे यांचीही उमेदवारी जाहीर झाली होती.

आता, शिवसेना ठाकरे गटाकडूनही उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील जागावाटप व मतदारसंघाबाबत माहिती देताना हडपसरमधून महादेव बाबर यांचे नाव जाहीर केले. राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच थेट सामना होणार आहे.

त्यामुळे, दोन्ही आघाड्यांमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून बहुतांश जागांवर एकमत झाले आहे. त्यात, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जागावाटपावर भाष्य करताना पुण्यातील हडपरसर मतदारसंघातील उमेदवारच घोषित केला आहे. पुण्यातील हडपसर विधानसभेची जागा उबाठा शिवसेना गट लढणार आहे, येथील मतदारसंघातून महादेव बाबर हे विधानसभा निवडणूक लढणार आहेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

तसेच, पुणे जिल्ह्यातील इतर काही जागांबाबत चर्चा सुरू आहे, पुण्यात १५ ते १८ जागांबाबत निर्णय राहिला आहे. तर, ७ ते ९ जागांवर एनसीपीएसपी व उबाठा आणि इतर जागांवर काँग्रेस अशी चर्चा झाल्याची माहिती अंधारेंनी दिली. त्यामुळे, पुण्यातील जागावाटपाचे गणितच अंधारेंनी उलगडले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र, महाविकास आघाडीत हडपसरची जागा ही शिवसेना यूबीटी उमेदवाराचीच असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे, महाविकास आगाघाडीमधील दोन्ही पक्ष यास मान्यता देतील का, हे पाहावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR