सोलापूर : सोलापूरचे नवे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पहिलाच दौरा पोलिस आणि कार्यकर्त्यांच्या बाचाबाचीमुळे गाजला आहे. गोरे यांच्या एन्ट्रीपूर्वीच सोलापूर शहरात स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर काढल्याने पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
पोलिसांच्या कारवाईविरोधात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. मात्र, आक्रमक कार्यकर्त्यांनी काढलेले बॅनर पुन्हा त्याच ठिकाणी लावले. त्यामुळे पालकमंर्त्यांच्या पहिल्याच दौ-यात जोरदार घमासन पहायला मिळाले. जयकुमार गोरे यांनी विकास कामांच्या नियोजनाच्या आढाव्याची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला गोरे हे आज सोलापूर शहरात आले होते. तत्पूर्वीच स्वागताच्या फलकावरून भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार घमासान पहायला मिळाले. स्वागत फलक काढण्यावरून भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सोलापुरातील सात रस्ता परिसरात ‘नो डिजिटल झोन’ असतानाही बॅनर लावले होते. मात्र, सात रस्ता चौक परिसर हा नो डिजिटल झोन आहे. याशिवाय शिवाय कोणतीही परवानगी न घेता हे बॅनर लावण्यात आले होते, त्यामुळे महापालिकेने कारवाई करत हे बॅनर हटवले होते. बॅनर हटविण्यासाठी सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांमध्ये आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, आम्ही फ्लेक्स लावण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून अर्ज केलेला होता. मात्र, पोलिसांनी कारवाई केल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. ते आंदोलन करणा-या भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, सोलापुरातील सात रस्ता परिसरातील ‘नो डिजिटल झोन’मध्ये लावण्यात आलेले स्वागताचे फलक पोलिसांनी तातडीने काढले. स्वागत फलक काढल्याने भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली होती. मात्र, बॅनर लावण्यासाठी भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक होते. त्यामुळे सोलापूर महापालिकेकडून बॅनर काढल्यानंतर त्याच जागी कार्यकर्त्याने पुन्हा बॅनर लावले आहेत.
पालकमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जयकुमार गोरे हे पहिल्यांदाच सोलापूर शहरात आज आले होते. त्यांच्या येण्यापूर्वी सोलापूर शहरात या घडामोडी घडल्याने त्याची विशेष चर्चा रंगली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी ‘नो डिजिटल झोन’मध्ये लावलेले बॅनर महापालिका हटवते का, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.