21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइराणमध्ये सत्तांतर, सुप्रिम लीडर खामेनेईंचा उमेदवार पडला

इराणमध्ये सत्तांतर, सुप्रिम लीडर खामेनेईंचा उमेदवार पडला

मसूद पेझेश्कियान नवे राष्ट्रपती

तेहरान : ब्रिटननंतर कट्टरपंथी इराणमधील निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. तिथेही सत्तांतर झाले असून कट्टरवादी सईद जलीली यांचा पराभव ढाला आहे. हेलिकॉप्टर अपघातात इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला होता. यामुळे तिथे मुदतपूर्व निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये मसूद पेझेश्कियान या सुधारणावादी नेत्याचा विजय झाला असून पुढील राष्ट्रपती असणार आहेत.

गेल्या अनेक दशकांपासून अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांशी इराणचे संबंध बिघडलेले आहेत. यातच रईसी यांच्या मृत्यूमागे अमेरिकेचा तर हात नाही ना याबाबतही संशय व्यक्त केला जात होता. एका कार्यक्रमाहून परतत असताना रईसी यांचे हेलिकॉप्टर जंगल परिसरात कोसळले होते. यानंतर या निवडणुका लागल्या होत्या. पेझेश्कियान यांनी इराणच्या जनतेला पाश्चिमात्य देशांशी संबंध सुधारण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे त्यांना या निवडणुकीत १६.३ दशलक्ष मते मिळाली आहेत. तर कट्टरपंथी नेते जलीली यांना १३.५ दशलक्ष मते मिळाली आहेत. नवे राष्ट्रपती हे पेशाने हृदयविकार तज्ञ आहेत. विजयाची चाहूल लागताच समर्थकांनी रस्त्यावर उतरून जल्लोष साजरा केला.

राष्ट्रपतीच्या मृत्यूनंतर ५० दिवसांच्या आत इराणमध्ये निवडणूक घ्यावी लागते. रईसी हे सुप्रिम लीडर आयतुल्ला अली खामेनेई यांचे निकटवर्तीय होते. जलीली देखील खामेनेई यांच्या विश्वासातील होते. त्यांचा पराभव झाला आहे. इराणमध्ये कोणाचेही सरकार आले तरी त्यांना सुप्रिम लीडरच्याच अधिपत्याखाली काम करावे लागते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR