36.8 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeमनोरंजन‘बडे मियॉ छोटे मियॉ’ रिलीज झाल्यानंतर जॅकी-रकुल जाणार हनिमूनला

‘बडे मियॉ छोटे मियॉ’ रिलीज झाल्यानंतर जॅकी-रकुल जाणार हनिमूनला

मुंबई : जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंग लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. या दोघांनी २१ फेब्रुवारीला गोव्यात धुमधडाक्यात सात फेरे घेतले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लग्नानंतर जॅकीचे वडील वासू भगनानी यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना नवविवाहित जोडप्याच्या रिसेप्शन आणि हनिमून प्लॅनची ​​माहिती सांगितली.

भगनानी म्हणाले की, देवाच्या आशीवार्दाने लग्न समारंभ चांगल्या पध्दतीने पार पडला. विवाह सोहळ्यासाठी आलेली सर्व पाहूने आणि कुटुंबातील सर्वंजण खूप आनंदी होते. यावेळी माध्यमांनी नव्या जोडप्याच्या हनिमून प्लॅनबद्दल विचारले असता वासू यांनी सांगितले की, ९ एप्रिल रोजी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपट रिलीज झाल्यानंतर ते त्यांच्या हनीमूनला जाण्याचा विचार करत आहेत, असे ते म्हणाले.

मुंबईत होणार रिसेप्शन पार्टी
अनेक वर्षाच्या प्रेम संबंधानंतर जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंग हे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तीन दिवस चाललेल्या या भव्य लग्न समारंभानंतर वासू भगनानी यांनी सांगितले की, लग्नाच्या सोहळ्याला काही कारणांमुळे मनोरंजन क्षेत्रातले आणि इतर बरेच लोक लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्यासाठी मुंबईतील त्याच्या निवासस्थानी रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR