19.1 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रझोपतून उठून शपथ घेणा-याचे चार दिवसांत पद गेले

झोपतून उठून शपथ घेणा-याचे चार दिवसांत पद गेले

बारामती : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्याच बरोबर राज्यात विविध ठिकाणी प्रचार सभांना देखील सुरुवात झाली आहे. लोकसभेप्रमाणे यावेली देखील संपूर्ण राज्याचे तसेच देशाची नजर बारामतीच्या लढतीकडे लागली आहे. येथे उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. काल सोमवारी अजित पवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या भाषणात भावनिक आवाहन केले होते. यावर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ कन्हेरी येथे आयोजित सभेत शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

शरद पवारांनी त्यांच्या भाषणात अजित पवारांवर जोरदार टीका केली. बारामतीत मी शेती, दूधाच्या संबंधी कारखाने, कंपन्या आणल्या. मी दारुचा कारखाना आणला नाही, या शब्दात अजित पवार यांच्यावर घणाघात करत शरद पवार म्हणाले, पक्ष मी काढला, चिन्ह माझे होते. काही लोकांनी वेगळा विचार केला. माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. ती वेळ त्यांनी आणली. शरद गोविंदराव पवार या नावाने मला पहिल्यांदा समन्स आले. केंद्र त्यांच्या हातात होते. कोर्टानेही पक्ष व चिन्ह त्या मंडळींची असल्याचे सांगितले. ही मोठी गंमतीची गोष्ट घडली. माझा पक्ष पळवला, चिन्ह पळवले पण जनतेच्या आग्रहाखातर मी पुन्हा जोर बांधला. पुढे बोलताना पवार म्हणाले, मी राज्यात अनेकांना मंत्री केले, उपमुख्यमंत्री केले. एकदाही सुप्रियाला पद दिले नाही. बाकीच्यांना पदे दिली, असे सांगत पवारांनी अजित दादांना टोला लगावला.

मी राज्य चालवायची जबाबदारी सोडत सगळा कारभार त्यांच्या हाती दिला. मी पक्षाचा अध्यक्ष होतो, पण नव्या पिढीकडे सगळे अधिकार दिले. गेली २० वर्षे मी बारामतीत लक्ष घातले नाही. साखर कारखाने, दूध संघ, बँक, खरेदी-विक्री संघ आदी संस्थांमध्ये कोणाला संधी द्यायची याचे सर्वाधिकार त्यांना दिले. तरी त्यांनी पहाटे सहालाच तिकडे जात शपथ घेतली. अनेकांना झोपेतून उठवून तिकडे नेले. परिणाम काय झाला, अवघ्या चार दिवसात पद गेले. त्यांच्या मदतीने कशासाठी पद घेतले हे समजत नाही. नंतरच्या काळात तर पक्षच घेवून दुसरीकडे जावून बसले. त्यातून त्यांना पद मिळाले, पण या आधी सुद्धा मिळाले होतेच ना, असे शरद पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR