25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रअग्रवाल पिता-पुत्राचा पाय आणखी खोलात; ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी

अग्रवाल पिता-पुत्राचा पाय आणखी खोलात; ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी

पुणे : प्रतिनिधी
पुणे ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल या पिता-पुत्राचा पाय आणखी खोलात गेला आहे. ड्रायव्हरच्या अपहरण प्रकरणात या दोघांनाही ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलाने कारने दोघांना चिरडल्यानंतर विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांनी त्यांच्या ड्रायव्हरला डांबून ठेवले, तसेच गाडी तूच चालवत होता, असा जबाब पोलिसांना दे, याबदल्यात बक्षीस देऊ, असे आमिष दाखवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोघांनाही ४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ड्रायव्हरला डांबल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सरकारी वकिलांनी सुनावणीवेळी ७ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. ड्रायव्हरचा फोन हस्तगत करायचा आहे. गाडी रिकव्हर केली आहे, त्याचा पुढचा तपास करायचा आहे. एकत्रित तपास करण्यासाठी ७ दिवसांची कोठडी हवी आहे, अशी मागणी सरकारी वकिलांकडून केली आहे. तसेच आणखी कुणी मदत केली आहे का? सीसीटीव्हीमध्ये छेडछाड झाली आहे ती कोणी केली आहे? याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

अपघाताची घटना वेगळी आहे. आम्हाला जॉईंट तपास करायचा आहे. मोबाईल तपास सुरू आहे, या सगळ्याकरता पोलिस कोठडी गरजेची आहे. कारण उर्वरित प्रकरणात आणखी लोक सहभागी असल्याचा संशय आम्हाला आहे, यासाठी चौकशी करणे आवश्यक आहे, अशी बाजू वकिलांनी मांडली.

दुसरीकडे अग्रवाल यांच्या वकिलांनी मात्र पोलिस कोठडी गरजेची नसल्याचा दावा केला. अपघातावेळी ड्रायव्हरला मारण्यात आले, ड्रायव्हर त्याच्या पत्नीसह घरी आला, आमचे मॉब लिंचिंग होईल असे त्याने सांगितले म्हणून तो घरी आला. नंतर फक्त त्याची बाईक घेण्यासाठी तो अग्रवाल यांच्या घरी आला, असा युक्तिवाद अग्रवाल यांच्या वकिलांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR