पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नेहरूनगर भागातील एका वसाहतीमध्ये रविवारी (२४ डिसेंबर) मध्यरात्री भीषण आग लागली. या भीषण आगीत दोन घरे आणि जवळपास २० दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.
पिंपरी-चिंचवडमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नेहरूनगर भागातील एका वसाहतीमध्ये रविवारी (२४ डिसेंबर) मध्यरात्री भीषण आग लागली. या भीषण आगीत दोन घरे आणि जवळपास २० दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवडच्या नेहरूनगर परिसरामध्ये विठ्ठलनगर नावाच्या वसाहतीमधील पाच नंबरच्या बिल्डिंगमध्ये रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीने अवघ्या काही क्षणांत रौद्ररूप धारण केल्याने बिल्ंिडगमधील दोन घरांसह २० दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या.
याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. ज्या बिल्डिंगमध्ये आग लागली त्या बिल्डिंगचे निर्माण पिंपरी-चिंचवड महापालिकेने केला आहे. मात्र या रहिवासी बिल्डिंगमधील फायर फायटिंग सिस्टम नसल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठी वित्तहानी झाली आहे. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप समोर आले नाही.
मालेगावात ३५ हून अधिक घरे जळून खाक
नाशिकच्या मालेगाव शहरातून आगीची घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव शहरातील आयेशा नगर भागात लागलेल्या आगीत ३५ हून अधिक घरे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.