17.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeराष्ट्रीयएआय सोबत अतिशय काळजीपूर्वक पुढे जावे लागेल : पंतप्रधान मोदी

एआय सोबत अतिशय काळजीपूर्वक पुढे जावे लागेल : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्लीत झालेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) शिखर परिषदेत ग्लोबल पार्टनरशिपमध्ये भाग घेतला. आपल्या भाषणात ते म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये (एआय) तंत्रज्ञानात बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. एआय वर्तमान आणि भावी पिढ्यांवर परिणाम करत आहे. एआय सोबत आपल्याला अतिशय काळजीपूर्वक पुढे जावे लागेल, असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, याबाबतीत आपण अधिक सावधगिरीने पुढे जावे. मला विश्वास आहे की दिल्लीत आयोजित या कार्यक्रमातून अनेक सूचना आणि कल्पना समोर येतील, ज्यामुळे आम्हाला मदत होईल. तसेच एआमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोके आणि आव्हानांपासून आम्ही जगाचे रक्षण करू असे सांगितले.

ते म्हणाले की, एआय हे २१व्या शतकातील विकासाचे सर्वात मोठे साधन बनू शकते आणि २१व्या शतकाला उद्ध्वस्त करण्यातही सर्वात मोठी भूमिका बजावू शकते. डीप फेकचे आव्हान संपूर्ण जगासमोर आहे, याशिवाय सायबर सुरक्षा, डेटा चोरी आणि एआय टूल्स दहशतवाद्यांच्या हाती येण्याचाही मोठा धोका आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की, एआयचा विकास-प्रवास जितका सर्वसमावेशक असेल तितके चांगले परिणाम समाजाला मिळतील. गेल्या दशकांपासून तंत्रज्ञानाच्या प्रवेशामध्ये असमानता होती, आता आपण समाजाचे अशा प्रकारच्या हानीपासून संरक्षण केले पाहिजे. जेव्हा लोकशाही मूल्ये तंत्रज्ञानाशी जोडली जातात, तेव्हा ते सर्वसमावेशकतेसाठी गुणक म्हणून कार्य करते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR