24.2 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeसोलापूरहोटगी रोडवरील विमानतळाचे काम प्रगतीपथावर

होटगी रोडवरील विमानतळाचे काम प्रगतीपथावर

सोलापूर : होटगी रोडवरील विमानसेवा लवकरच सुरु होणार आहे. येत्या ऑगस्टपासून सोलापूर-मुंबई अन् सोलापूर हैदराबाद दरम्यान विमानसेवा सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत. होटगी रोडवरील विमान सेवा सुरू करण्यासाठी विमानतळावर तब्बल चार कोटी रुपये खर्च करून विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असल्याने मागील अनेक वर्षांपासूनची सोलापूरकरांची मागणी पूर्ण होणार आहे.

दरम्यान, सध्या विमान प्राधिकरणाने सुचवलेली ७५ ते ८० टक्के कामे झाली आहेत. तर उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. यात रनवे दुरुस्ती, संरक्षक भिंत, पार्किंग व्यवस्था, रनवे कार्पेटिंग, टर्मिनल इमारत तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कामांना वेग आला आहे. तसेच याठिकाणी दोन विमानं थांबू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच येथे हेलिपॅडसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. विमान दुरुस्तीचे काम येथे होणार आहे.

सोलापूर शहरातून लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. शिवाय दळणवळण गतीने होणार असल्याने विकासाला गती मिळणार आहे. आयटी कंपनी जर सोलापुरात आले तर तरूणांचे स्थलांतरही थांबणार आहे. सोलापूर- हैद्राबाद आणि सोलापूर-मुंबई या दोन शहरांसाठी विमानसेवा सुरू होत आहे. त्यानंतर इतर शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याने सोलापूर शहराचे इतर शहराची कनेक्टेव्हिटी वाढणार आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR