27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeपरभणीश्री धर्म जागरण मंचकडून ऐश्वर्या चौधरी, सृष्टी अंभुरे यांचा सत्कार

श्री धर्म जागरण मंचकडून ऐश्वर्या चौधरी, सृष्टी अंभुरे यांचा सत्कार

बोरी : येथील कु. ऐश्वर्या जालिंदरराव चौधरी यांची राज्य उत्पादन शुल्क विभागात तर वर्ण येथील कु. सृष्टी पांडुरंग अंभुरे यांची कृषी सहायक पदी राज्यसेवा सरळ भरती मार्फत निवड झाल्याबद्दल श्री धर्मजागरण मंचच्या वतीने दोघींचा श्री रामेश्वर सोमेश्वर महादेव मंदिरात सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना सृष्टी अंभुरे यांनी आईवडीलांनी मुलींवर दाखवलेल्या विश्वासास पात्र राहून त्यांचे स्वप्न पुर्ण करण्याची मेहनत घ्यावी असे सांगीतले. यावेळी कृ.उ.बा.स. बोरीचे उपसभापती यशवंतराव चौधरी, व्यापारी दिपकसेठ बुब, तुकाराम गोरे, काशीनाथआप्पा स्वामी, गणेश बुलबुले, विकास काळे, किरण डाके, चंद्रशेखर चौधरी, विशाल वाघमारे, मयूर जाधव, अनिल गोरे, संतोष वाकुडे, गजानन इंगोले वैभव कंठाळे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. सुत्रसंचालन योगेश चौधरी यांनी केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR