22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमनोरंजनअजय देवगणला दुखापत

अजय देवगणला दुखापत

‘सिंघम ३’ च्या सेटवर अपघात

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगण अभिनित ‘सिंघम ३’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच आता ‘सिंघम ३’च्या सेटवर अपघात झाला आहे. अजय देवगणला दुखापत झाली आहे. त्यामुळे सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.
अजय देवगण सध्या ‘सिंघम ३’ या सिनेमामुळे चर्चेत आहे.

सध्या तो या सिनेमाचे शूटिंग करत आहे. अजयसह या सिनेमात टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहेत. अजयचे चाहते आणि सिनेप्रेमी या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अजयचा धमाकेदार अंदाज या सिनेमात पाहायला मिळणार आहे. अशातच आता ‘सिंघम ३’च्या सेटवर अपघात झाला आहे. त्यामुळे या सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. या अपघातात अजयला दुखापत झाली आहे.

अजयच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. डोळ्याला दुखापत झाल्याने त्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागला. त्याला दुखापत झाल्याने ‘सिंघम ३’चे शूटिंग थांबवण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR