22 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeक्रीडाअजिंक्य रहाणे रमला चिमुकल्यांसोबत अंगणवाडीत

अजिंक्य रहाणे रमला चिमुकल्यांसोबत अंगणवाडीत

सोलापूर : भारतीय क्रिकेट संघातील खेलाडू अजिंक्य रहाणे याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या गावातील अंगणवाडी, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट दिली. या वेळी त्याने अंगणवाडीतील खिचडीचा आस्वाद घेत चिमुकल्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

‘अर्थ फिट’ या सामाजिक संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेले विविध शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी रहाणे हा सोलापुरात आला होता. मंगळवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर गावात त्याने जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाडीसह ग्रामपंचायतीला भेट दिली.

अंगणवाडीतील चिमुकले विद्यार्थी, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत रहाणे याने मनमोकळ्या गप्पा मारल्या. अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत असलेल्या खिचडीचा आस्वाद घेतला. अंगणवाडीतील स्वयंपाकगृहाची त्यांनी पाहणी केली. नंतर मुलांमध्ये बसून गप्पा मारल्या. या वेळी विविध वस्तूंची असलेली ओळख त्यांनी मुलांकडून जाणून घेतली.भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे हे वडापूर गावात आल्याची माहिती पंचक्रोशीत कळल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी, विशेषत: क्रिकेटप्रेमी तरुणांची गर्दी झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR