36.1 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeसोलापूरअक्षय इंगळे ,अनुष्का पवार जिल्हा खोखो संघाचे कर्णधार

अक्षय इंगळे ,अनुष्का पवार जिल्हा खोखो संघाचे कर्णधार

सोलापूर: कुपवाड (सांगली) येथे ५ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या भाई नेरुरकर राज्य खो-खो स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा पुरुष संघाच्या कर्णधारपदी किरण स्पोर्ट्स क्लबच्या अक्षय इंगळे व किशोरी संघाच्या कर्णधारपदी अर्धनारी नटेश्वर वेळापूरच्या अनुष्का पवार यांची निवड करण्यात आली.

किशोरी संघाचे सराव शिबिर नेहरूनगर शासकीय मैदानावर समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने व ह. दे. प्रशालेच्या मैदानावर पुरुष संघाचे शिबिर उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने पार पडले. दोन्ही संघास असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशनचे सचिव ए. बी. संगवे, पंचमंडळ सदस्य अजित शिंदे, संघांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक सुनील चव्हाण, उमाकांत गायकवाड, राजाराम शितोळे, सोनाली शिंदे-यादव, पुंडलिक कलखांबकर आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR