17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपरग्रहवासी पृथ्वीवरच लपून बसलेले!

परग्रहवासी पृथ्वीवरच लपून बसलेले!

नासाच्या माजी शास्त्रज्ञाचा दावा मनुष्यासाठी त्यांना शोधणे अशक्य

मुंबई : एलियन्सबद्दल दररोज नवनवीन दावे समोर येत असतात असे म्हटले जाते की एलियन्स हे यूएफोने वारंवार पृथ्वीवर येत असतात. ब्रिटनमध्ये अडीच वर्षांत सुमारे १००० यूएफओ दिसले आहेत, असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यापूर्वी, एका तज्ज्ञाने सांगितले होते की, एलियन्सचा शोध लागू नये म्हणून ते आपल्या सूर्यमालेच्या अगदी बाहेर गडद अंधा-या ठिकाणी लपलेले असू शकतात. पण, आता नासाच्या एका माजी संशोधकाने अनोखा दावा केला आहे.

यूएफओचे पायलट हे महासागराखाली असू शकतात असा दावा त्यांनी केला आहे. २००१ ते २००५ या कालावधीत नासाच्या एम्स रिसर्च सेंटरमध्ये काम केलेले केविन नूथ यांच्यामते, अशी कारणे आहेत ज्यावरुन असे दिसून येते की एलियन्स पृथ्वीच्या पृष्ठभागावर न राहता पाण्याखाली राहून आपल्यावर लक्ष ठेवत असतील. जर त्यांना लपून राहायचे असेल तर समुद्राचा तळ त्यांच्यासाठी एक सर्वोत्तम जागा असेल. तेथे त्यांनी त्यांचा तळ बांधला असावा आणि तिथे ते वास्तव्य करत असतील. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ७५% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि प्रत्यक्षात आपण त्या संपूर्ण भागात पोहोचू शकलेलो नाही. त्यामुळे, एलियन्सना लपण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे असे त्यांनी थिअरी ऑफ एव्हरीथिंग पॉडकास्टला सांगितले.

यूएफओच्या अलीकडील अनेक दृश्यांमध्ये विमानांचा समावेश आहे, जे हवेत आणि समुद्राच्या आत सहजपणे फिरताना दिसतात. जर एलियन्स हे जलचर वातावरणातून आलेले असतील तर त्यांच्यासाठी ते अधिक सोयीस्कर असेल असेही केविन यांनी सांगितले.

ग्रहांवर वेगवेगळे वातावरण
वातावरणातील उष्णतेची क्षमता कमी असते, त्यामुळे तापमानात बरंच व्हेरिएशन होत असते. त्यामुळे तापमानात मोठा फरक जाणवतो. एका ग्रहावरून दुस-या ग्रहावर जाताना, तुमच्या वातावरणातील तापमानात प्रचंड फरक पडतो. जर, आपण मंगळावर गेलो तर तापमान शून्य फॅरेनहाइटपेक्षा १०० अंश खाली असेल. जर तुम्ही शुक्र ग्रहावर गेलात तर ते ८०० डिग्री फॅरेनहाइट असेल. शुक्रावरील वातावरणात आपल्यापेक्षा सुमारे १०० पटीने अधिक घनता आहे, तर मंगळावरील हवा सुमारे १०० पटीने थीन आहे असेही त्यांनी सांगितले.

समुद्रात राहणे अधिक सोयीस्कर
पृष्ठभागावर राहायचे झाल्यास अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. परंतु, जर तुम्ही महासागरात राहात असाल तर तुम्हाला महासागर असलेल्या दुस-या ग्रहावर जाणे अधिक सोपे होईल. महासागराचे तापमान ३२ डिग्री फॅरेनहाइट आणि २१२ डिग्री फॅरेनहाइट दरम्यान असेल. त्यामुळे महासागर असलेल्या एका ग्रहावरुन दुस-या ग्रहावर जाताना तापमानात फारसा बदल होणार नाही, त्यामुळे ते अधिक सोयीस्कर असेल असेही केविन यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR