24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रफडणवीसांसह अभिनेता स्वप्नीलला झापले

फडणवीसांसह अभिनेता स्वप्नीलला झापले

ऑनलाईन जुगारावरून संभाजीराजे आक्रमक विधान भवनावर चालून येण्याचा इशारा

मुंबई : ऑनलाईन रमी, ऑनलाईन जुगारबाबत स्वराज्य पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. हे तात्काळ बंद करावेत. या कायद्यात तुम्ही बदल केला नाही किंवा सभागृहात या विषय मांडला नाही तर येत्या ९ तारखेला आम्ही तुम्हाला जाब विचारु, असा इशारा संभाजीराजे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

संभाजीराजेंनी म्हटले आहे की, स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ धनंजय जाधव यांनी पोलिसांकडे पाठपुरावा केला.पोलिस म्हणतात की ऑनलाईन रमी, ऑनलाईन जुगार असे खेळ खेळू नका. ते बेकायदेशीर आहेत आणि कोण खेळताना दिसले की त्याच्यावर कडक कारवाई करणार! आणि त्याच पोलिसांचे गृहमंत्री काय म्हणतात? आपल्याला महसूल मिळतो… पैसा मिळतो… मग चालूदे ! म्हणजे गृहमंत्री आणि पोलिस यांच्यातही काही समन्वय नाही…! रमी खेळणे म्हणजे वाईट गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे अशी शिकवण आपल्याला लहानपणापासूनच समाजात मिळत असते. मात्र आता उघडपणे रमी खेळा म्हणून केल्या जाणा-या जाहिराती आपण समाज म्हणून कशा काय सहन करू शकतो? मला फडणवीस साहेबांच्या वक्तव्याच आश्चर्य वाटतं, पण आरआर आबा यांच्या सारखा धाडसी निर्णय फडणवीस घेणार का ? असा सवाल त्यांनी केला.

हे सर्व थांबावे यासाठी गेल्या वर्षभरापासून स्वराज्य पक्षाने यावर सर्व चौकशी करून, या विषयाच्या मुळापर्यंत जात सर्व माहिती काढलेली आहे.ज्या जाहिराती दाखवल्या जातात, जाहिरातींमधून जी प्रलोभने दिली जातात, श्रीमंत होण्याचे आमिष दाखवले जाते ते सर्व खोटे असते याचे सर्व पुरावे स्वराज्य पक्षाने गोळा केलेले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR