22.9 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeमनोरंजन‘अल्याड पल्याड २’ येणार

‘अल्याड पल्याड २’ येणार

मुंबई : बॉक्स ऑफिसवर हॉरर कॉमेडीपटांची चलती आहे. बॉक्स ऑफिसवर ‘अल्याड पल्याड’ या मराठी हॉरर कॉमेडीपटाने चांगलीच कमाई केली आहे. ‘अल्याड पल्याड’ बॉक्स ऑफिसवर कमाई करत असताना दुसरीकडे आता या चित्रपटाच्या दुस-या भागाची घोषणा करण्यात आली आहे. ‘अल्याड-पल्याड २’ हा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरणाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रतिसादानंतर आता निर्माते शैलेश जैन, महेश निंबाळकर आणि दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील ‘अल्याड पल्याड २’ ची घोषणा केली आहे. चित्रपटाचे पोस्टर सोशल माध्यमावर पोस्ट करत ‘अल्याड पल्याड’ चा सिक्वेल अर्थात ‘अल्याड पल्याड २’ ची घोषणा करण्यात आली आहे.

‘अल्याड पल्याड’ चित्रपटात भयासोबत विनोदाची सुद्धा किनार होती. भयाबरोबरच विनोदाचीसुद्धा योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. आमचा पहिला चित्रपट लोकांना इतका आवडला आहे आणि त्याच्या दुस-या्या भागाची उत्सुकता आहे याचे आम्हाला खरंच खूप छान वाटतेय, अशा भावना कलाकारांनी व्यक्त केल्या. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक,सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यमजैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात आहेत.

दर्जेदार कलाकृतीचा निर्माता म्हणून मिळणारे समाधान आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असून नवनवीन विषय घेऊन येण्याची मराठीची क्षमता बघूनच मराठीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतल्याचे निर्माते शैलेश जैन आणि महेश ंिनबाळकर यांनी सांगितले. ‘अल्याड पल्याड’ चा सिक्वेल ही रसिकांना मनोरंजनाचा नक्कीच आनंद देईल, असा विश्वास दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR