24.1 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्र‘आंबेमोहोर’ महागणार

‘आंबेमोहोर’ महागणार

किलोमागे १० ते १५ रुपये दरवाढीचा अंदाज

पुणे : प्रतिनिधी
सुंगधित असलेल्या आंबेमोहोर तांदूळ पुणेकरांच्या पसंतीला उतरला असून, नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच गेल्या वर्षीच्या तुलनेत या तांदळाच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात तांदळाचे प्रतिक्विंटल दर आठ हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या वर्षी तांदळाच्या दरात प्रतिक्विंटल पाचशे ते एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे, तर ग्राहकांना एका किलोसाठी १० ते १५ रुपये जादा द्यावे लागणार आहेत.

सुगंधी आंबेमोहोर ‘तांदळाचा राजा’ म्हणून ओळखला जातो. डिसेंबरच्या शेवटी नवीन आंबेमोहोर तांदळाची आवक होण्यास सुरुवात होते. हा तांदूळ महाराष्ट्रात बाराही महिने खाण्यात येतो. विशेषत: पुण्यात आंबेमोहोर तांदळाला खूप मोठी मागणी आहे. या वर्षी आंबेमोहोर तांदूळ १० ते १५ रुपये प्रतिकिलो महाग होणार आहे. या वर्षी बासमती तांदळाच्या दरांपर्यंत आंबेमोहोर तांदळाचे दर पोहोचतील, असा अंदाज आहे.

महाराष्ट्रात कामशेत, भोर या भागात काही प्रमाणात त्याचे उत्पादन घेतले जाते. काही वर्षांपूर्वी आंबेमोहोरचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात घेतले जात होते. मात्र, पुणे, मावळ, भोर, कामशेत या पट्ट्यात झपाट्याने शहरीकरण वाढले आहे. ज् वर्षातून एकदाच घेतले जाणारे पीक असल्यामुळे आणि पीक येण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे ब-याच शेतक-यांनी त्याचे उत्पादन घेणे कमी केले. म्हणून महाराष्ट्रातून आंबेमोहोरचे उत्पादन कमी होत आहे.

आंबेमोहोरची दरवाढ का?
सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने नॉनबासमती तांदळावरची निर्यात बंदी उठवली, केंद्र सरकारने निर्यात कर २० टक्के कमी केला.आंबेमोहोर तांदळाला परदेशातून खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली मागणी,महाराष्ट्रात येणा-या एकूण आंबेमोहोर तांदळापैकी ८० टक्के तांदूळ मध्य प्रदेशातून; तर २० टक्के तांदूळ आंध्र प्रदेशातून येतो. या वर्षी या दोन्ही राज्यांमध्ये आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन कमी असल्याने दर वाढणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR