22.6 C
Latur
Saturday, July 20, 2024
Homeमहाराष्ट्रअमित शहांनी ‘टूर अँड ट्रॅव्हल्स’ नवीन खाते उघडले

अमित शहांनी ‘टूर अँड ट्रॅव्हल्स’ नवीन खाते उघडले

भाजपच्या मोफत अयोध्यावारीवरून राज ठाकरेंचा टोला

मुंबई : ‘अमित शहांनी आता टूर अँड ट्रॅव्हल्स असे नवीन खाते उघडले असेल. कुणी काय कामं केली यावर निवडणूक लढवा. राम मंदिरांचं आमिष कशाला दाखवता, असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील चंदेरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार जगन्नाथ सिंह रघुवंशी यांच्या बाजूने जाहीर सभेला संबोधित केले. भाजपचे उमेदवार जगन्नाथ सिंह रघुवंशी यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच भाजप सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि राम मंदिर निर्माण, कलम ३७० हटवणे यासह राष्ट्रीय मुद्यांवर जनतेला संबोधित केले.

अमित शहा यांनी अयोध्या मंदिराच्या नावावर पुन्हा एकदा लोकांना भाजपला मतदान करण्यास सांगितले. भाजपचे सरकार आले तर सर्वांना अयोध्येतील राम मंदिराचे एक एक करून दर्शन घ्यायला नेऊ, असे अमित शहा म्हणाले होते. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले आहे. राज्यात घाणेरडी परिस्थिती आहे. मतदार येणा-या निवडणुकीत काय करणार आहेत हे पाहावे लागेल. उमेदवारांना मतदारांची भीती वाटली पाहिजे. राज्याची स्थिती संभ्रमावस्थेत टाकणारी आहे. सध्याचे चित्र सरळ दिसत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

पदवीधर निवडणुकीत उमेदवार पदवीधर हवा : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज, ठाणे शहराच्या दौ-यावर आहेत. या बैठकीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पदवीधर निवडणुकीत उमेदवार हा पदवीधर हवा अशी अट का नाही? म्हणत निवडणुकीवर आक्षेप घेतला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR