26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यातील कारखान्यातून अमोनिया गॅस लीक, १७ कर्मचारी रुग्णालयात

पुण्यातील कारखान्यातून अमोनिया गॅस लीक, १७ कर्मचारी रुग्णालयात

पुणे : प्रतिनिधी
पुणे शहराजवळ असलेल्या यवत येथील एका कंपनीत धोकादायक प्रकार घडला. फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये अमोनिया वायूची गळती सुरू झाली. यामुळे कारखान्यातील काम करणा-या १७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १७ जणांमध्ये अनेक महिला असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला आयसीयूमध्ये ठेवले आहे. यवतजवळील भाडगाव येथे बुधवारी सकाळी रेडी-टू-ईट फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये ही घटना घडली.

पोलिस अधिकारी नारायण देशमुख यांनी सांगितले की, रेडी-टू-ईट खाद्यपदार्थ बनवणा-या कंपनीत अमोनिया गॅसचा वापर केला जातो. त्यासाठी त्या ठिकाणी १८ डिग्री सेल्सियस तापमान ठेवले जाते. त्या कारखान्यात घटना घडली तेव्हा २५ जण काम करत होते. त्यातील १७ जण अमोनिया गॅसची गळती होणा-या भागाच्या जवळ होते. यामुळे सर्वांना त्रास होऊ लालगा. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

१६ कर्मचा-यांची प्रकृती स्थिर
कंपनीतील कर्मचा-यांनी बेचैनी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्वरित कंपनीत तपासणी करण्यात आली. त्यावेळी अमोनिया वायूची गळती सुरू असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मुख्य रेग्युलेटर त्वरित बंद करण्यात आले. त्यामुळे मोठा अपघात टळला. अन्यथा दुर्घटना घडली असती. १६ कर्मचा-यांची प्रकृती स्थिर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR