30.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रअमोल कोल्हे - शिवाजीराव आढळराव पाटील आमने-सामने

अमोल कोल्हे – शिवाजीराव आढळराव पाटील आमने-सामने

पुणे : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. त्यामुळे अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर जात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतात. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील किल्ले शिवनेरीवर जात महाराजांना अभिवादन केले.

यावेळी हे दोन्ही नेते समोरासमोर आले. यावेळी दोघांमध्ये काहीवेळासाठी बातचितही झाली. यावेळी अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांना वाकून नमस्कार केला. आज शिवरायांची जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी मी शिवनेरीवर आलो आहे, असे अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.

दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची आणि स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही. ही प्रेरणा किल्ले शिवनेरीवर मिळते. कोणत्याही मंदिरात जाण्याआधी पहिले नतमस्तक झालो. तो शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीवर. पहिला पायरीचे दर्शन घेतल्यानंतर संघर्षाची, स्वाभिमानाची प्रेरणा मिळते. लढण्यासाठी ताकद द्या. सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्याची प्रेरणा द्या. हेच आज शिवनेरीवर नतमस्तक होताना मागणं मागितलं, असे अमोल कोल्हे म्हणाले.

मी नौटंकी करत नाही : आढळराव पाटील
अनेक वर्षांपासून तारखेनुसार आणि तिथीनुसार शिवजयंतीला मी शिवनेरीवर येण्याचा प्रयत्न करत असतो. मी आज शिवनेरीच्या पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन माझ्या प्रचाराची सुरुवात केली आहे. यापुढचे आयुष्य माझे शेतक-यांच्या प्रश्नासाठी, कांद्याला बाजारभाव आणि दुधाला बाजारभाव देण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे. नौटंकी मी करत नाही. मी शेतकरी कुटुंबातील माणूस असल्याने मला शेतक-यांच्या वेदना माहिती आहेत, असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR