बुलडाणा : प्रत्येक महिलेने अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानलं पाहिजे. महिलांनी स्वत:ची उंची स्वत: ठरवली पाहिजे असा सल्ला मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी महिलांना दिला आहे. काल बुलडाण्यात झालेल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात ते बोलत होते.
ज्या ब्राह्मण समाजातील महिलांनी अन्याय, अत्याचार झुगारून दिले. त्याप्रमाणे प्रत्येक महिलांनी स्वत:ची उंची स्वत: ठरवली पाहिजे. महिला या मोठा बदल घडवून आणू शकतात.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानली पाहिजे. ज्या देवेंद्र फडणवीस यांना केस कापायला जायचे असेल तर त्यांना विचारून जातात. तुम्ही तुमची स्वत:हून जोपर्यंत उंची वाढवणार नाही. तोपर्यंत दुसा-याकडून काही अपेक्षा ठेवू नये हा स्त्रीवाद आम्हाला अपेक्षित आहे. हा प्रत्यक्षात आणावा. स्वत:तयार व्हा, असेही पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जग बदलायचं तेव्हा बदलेल, बदलाची सुरुवात सर्वप्रथम कुटुंबाला विश्वासात घेऊन करा. आजही आम्ही बहुसंख्येने असलो तरी विषमतावादी, वर्ण वर्चस्ववादी वैदिक साहित्याचे हमाल म्हणूनच ओझे वाहत आहोत. धर्माची दारू, जातीची नशा, परधर्माचा टोकाचा द्वेष आपल्या उंबरठ्याजवळ आला आहे. अशा वेळी साहित्यिकांनी समाज परिवर्तनासाठी आपली लेखणी झिजवावी असंही खेडेकर यांनी म्हटले आहे.