23.2 C
Latur
Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रमृत महिलेच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत जाहीर

मृत महिलेच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत जाहीर

मुंबई : पुण्यातील पोर्शे कारचे हिट अँड रन प्रकरण अजूनही ताजे असतानाच, रविवारी पहाटे मुंबईतील वरळी भागात असाच एक दुर्दैवी प्रकार घडला. २४ वर्षीय मिहीर शाह याने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील महिला कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या प्रकरणात नाखवा कुटुंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नाही, पण मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मदत जाहीर केली आहे अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. मुंबई सागरी किनारा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला तब्बल ६० तासांनंतर मंगळवारी शाहपूरमधून अटक करण्यात आली. अपघातानंतर त्याने आपली कार वांद्रे, कलानगर परिसरात सोडली होती आणि वडील राजेश यांना फोन करून घटनाक्रम सांगितला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR