चंदीगड : हरियाणातील गुरुग्राममध्ये बांधकामाधीन इमारत कोसळल्याने काही कामगार गाडले गेल्याचे वृत्त आहे. गुरुग्रामचे एसीपी मुकेश कुमार यांनी माध्यमांना सांगितले की, एनडीआरएफला याबाबत माहिती देण्यात आली आहे. आम्हाला नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की, एका मंदिराजवळ बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळली असून त्याखाली काही कामगार गाडले गेले आहेत. दबलेले मजूर दिसत असून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अडकलेल्या कामगारांची माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. वृत्तसंस्थेनुसार, अडकलेल्या कामगारांची संख्या पाच असल्याचे सांगण्यात येत आहे.