सोलापूर : प्रलंबित मागण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी पुनम गेट येथे आंदोलन केले. त्या आंदोलनास विरोधकांनी भेटी देऊन पाठिंबा दिल्यामुळे आंदोलन बापू समर्थकांचे अन पाठिंबा विरोधकांचा अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. आदिवासी महादेव कोळी जमातीवर आजपर्यंत अन्याय होत आहे.
आम्हाला अनुसूचित जमातीचे दाखले लवकर मिळत नाहीत, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, जात प्रमाणपत्र मिळाले, तर वैधता प्रमाणपत्र नाकारले जाते,अशा अनेक विषयांना वाचा फोडण्यासाठी आमदार सुभाष बापू देशमुख यांचे समर्थक सूरज खडाखडे यांच्या नेतृत्वात एकदिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटसमोर करण्यात आले.
यावेळी माजी आमदार दिलीप माने. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी पाठींबा दिला तसेच स्वंयशिक्षा फाउंडेशन चे प्रमुख सोमनाथ वैद्य यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि आंदोलकानच्या जेवण्याची सोय ही त्यांच्या संस्थे च्या माध्यमातून केली. सोमनाथ वैद्य हे भाजप मधून येत्या सर्वत्रिक विधानसभे च्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.
वैद्य यांनी बापूंना पक्षा अंतर्गतच आव्हान तयार केले आहे दक्षिण तालुक्यात त्यांनी लावलेल्या बॅनर वर भाजप उतरचे आमदार विजयकुमार देशमुख, अक्कलकोट चे आमदार सचिन कल्यानशेट्टी, करमाळ्याचे आमदार राम सातपुते यांचे फोटो लावले होते परंतू दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांचा फोटो वगळून थेट बापू यांना पक्ष अंतर्गतच विरोध केला आहे. त्यामुळे बापू समर्थकांच्या आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा देऊन बापूंना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.