29.6 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeसोलापूरलाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

सोलापूर : राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी तहसिल कार्यालयांवर तुफान गर्दी केली होती. त्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या महिलांकडून घरच्या घरीच अर्ज भरून घेण्यासाठी अंगणसेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिलांवर ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कामही सुरू झाले. पण हे काम सुरू असताना एक दुर्देवी घटना घडली आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून घेत असताना एका अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा सर्व्हे करून फॉर्म भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांवर दिलेली आहे. त्यामुळे गावोगावच्या अंगणवाडी सेविका गावात घरोघरी फिरून नारी दूत या अ‍ॅपवरून फॉर्म भरीत आहेत. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील देगाव मधील अंगणवाडी क्रमांक १ च्या सेविका फॉर्म भरत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटक आल्याने त्या खुर्चीत कोसळल्या. यावेळी मदतनीस किचनमध्ये भांडी स्वच्छ करत होत्या. जोराचा आवाज झाला म्हणून घाबरून त्या आत आल्या असता अंगणवाडी सेविका सुरेखा आतकरे या खुर्चीत निपचित पडल्याच त्यांना दिसले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR