22.8 C
Latur
Thursday, February 22, 2024
Homeसोलापूरअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

सोलापूर – अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर चटणी-भाकर आंदोलन करण्यात आले. ‘तुम्ही खावा तूपसाखर, आम्ही खातो चटणी-भाकर, अशा घोषणा देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाचा निषेध केला.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात कांचन पांढरे, सरला चाबुकस्वार यांच्यासह मोठ्या प्रमाणात अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. अंगणवाडी कर्मचारी हे प्रलंबित मागण्यांसाठी ४ डिसेंब पासून बेमुदत संपावर आहेत. आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलने करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR